*⚡बांदा ता.०८-:* असनिये-गावठणवाडी येथे बोलेरोने विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. यात बोलरोचे नुकसान झाले असून, विद्युत खांब पूर्णपणे तुटला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. गावठणवाडी येथील अंगणवाडीच्या रंगकामासाठी रंग घेऊन हा बोलेरो आला होता. गाडी मागे घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बोलेरोची धडक विद्युत खांबाला बसली. धडक जोरदार असल्याने खांब पूर्णपणे तुटला. यामुळे गावठणवाडी येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या अपघातात बोलेरोचे देखील नुकसान झाले.
असनिये-गावठणवाडीत बोलेरोची विद्युत खांबाला धडक
