Headlines

गोवा राज्यात जाऊन रक्तदान करत २३ युवकांचा समाजासमोर नवा आदर्श

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची विशेष मेहनत

*सावंतवाडी :* युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाच कार्य अविरत राखण्यात आल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात देखील तब्बल 23 युवकांनी रक्तदान करत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी विशेष मेहनत घेतली. व्हिजन हॉस्पिटल गोवा येथे उपचार घेत असलेल्या वेंगुर्ला येथील वैद्य या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असताना गोव्यात कामाला असणारे वैभव पेडणेकर यांनी अॅजिलो रुग्णालयातील रक्तपेढीत जात त्या रुग्णाचे जीव वाचवले. शिरोडा येथील रूग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या प्रशांत पेडणेकर याला ओ पॉझिटीव्ह या रक्तगटाची तातडीने आवश्यकता असताना भूषण नाईक, भरत पगारे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जात रक्तदान केल. यासाठी अखिलेश कानसे या युवकाच विशेष सहकार्य लाभल. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला बी पॉझिटीव्ह या रक्तगटाची आवश्यकता असताना परेश कर्पे यांनी रक्तदान केल.कुडाळ येथील रुग्णालयात दाखल आलेल्या अनिल सावंत याला एबी पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना नुमान समेजा यांनी रक्तदान केल.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला ओ पॉझिटीव्ह या रक्तगटाची आवश्यकता असताना आशिष साखळकर यांनी रक्तदान केल. कुडाळ इथ उपचारासाठी दाखल असलेल्या शाहीन खान या रुग्णाला ए पॉझिटीव्ह रक्ताच्या पिसिव्हीची आवश्यकता असताना अक्षय मयेकर यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात जात रक्तदान केल. सावंतवाडी येथील डॉ. कश्यप देशपांडे यांच्या रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या आनंदी परब यांना ऑपरेशन दरम्यान ए पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता होती यावेळी निलेश नाईक यांनी रक्तदान केल. तर उपजिल्हा रुग्णालयातील रश्मी मेस्त्री या रुग्णाला ओ पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना गौरव सुकी यांनी रक्तदान केल. डॉ. पावसकर यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वैशाली गावडे यांना ओ पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना प्रभाकर वडार यांनी रक्तदान केल. यावर्षी तब्बल ४ वेळा त्यांनी रक्तदान केल आहे. उपजिल्हा रुग्णालयातील दीपिका कोडगनूर यांना बी पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना विकास चव्हाण यांनी रक्तदान केल. वेंगुर्ला येथील पांढरे या रुग्णास प्रसूती दरम्यान ए पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना निमिष पटेकर यांनी रक्तदान केल. डॉ. स्वार यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या राशी गावडे यांना ए पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना पिटर परेरा, प्रथमेश मुरगोड यांनी रक्तदान केल. डॉ. गुप्ता यांच्याकडे उपचार घेणाऱ्या सुरेश वाडकर या रुग्णाला अंकुश नाईक यांनी रक्तदान केल. डॉ. दुर्भाटकर यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ज्योती बाईत ओ पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना अमीर खान यांनी दान केल. तर अनिता अंकुश लाखे या रुग्णाला बी पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना मंगेश सुभेदार यांनी रक्तदान केल. डॉ. पावसकर यांच्या रुग्णालयामध्ये शंकर दळवी यांना ऑपरेशन दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, अभय देसाई यांनी रक्तदान केल. कुडाळमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णाला ओ पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना अथर्व सावंत यांनी, जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या स्नेहल असणकर या रुग्णाला बी पॉझिटीव्ह रक्ताची आवश्यकता असताना सागर सावंत, वैभव दळवी यांनी रक्तदान केल. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या लवू राघो सावंत या रुग्णाला ए पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती तेव्हा अंकीत पारकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले तब्बल 23 रक्तदात्यांनी रक्तदान करत 19 जणांना जीवदान दिलं आहे. सावंतवाडीसह गोवा, वेंगुर्ला, कुडाळ, ओरोस आदी भागात जात या युवकांनी समाजाशी असलेल रक्ताच नातं जपलं असून या युवकांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले असून समाजासाठी युवकांनी पुढे येत रक्तदानाच महान कार्य कराव असं आवाहन केलं.

You cannot copy content of this page