कासार्डे येथे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ह्यूमन एटीएम सेवेचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक एटीएम सुविधा उपलब्ध नसलेल्या शाखांच्या परिसरातील इतर बँकांची एटिएम असलेल्या ग्राहकांना एटिएम सुविधा मिळण्यासाठी ह्यूमन एटिएम सेवा कार्यान्वीत करीत असून, त्याचा शुभारंभ शनिवार ९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ठीक ४.३० वाजता बँकेच्या कासार्डे शाखेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनून सतिश सावंत, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देवगड कणकवली मतदार संघाचे माजी आम.प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यास सुरेश दळवी ( उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा बँक) बाळाराम तानवडे -(सरपंच कासार्डे),श्रीम. साक्षी सुर्वे ( सरपंच तरळे) , श्रीपत पाताडे – (अध्यक्ष, कासार्डे विकास से.सो.लि.) ,विनायक राणे (अध्यक्ष, तरळे विकास से. सो. लि.)आदि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत या शुभारंभ सोहळ्यास सर्वांनी उपस्थिच रहावे असे आवाहन जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर , रामचंद्र मर्गज ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई व जिल्हा बँक संचालक मंडळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page