मंदिरांचे दरवाजे उघडले..जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे उघडणार कधी ?

मनसेच्या प्रसाद गावडे यांचा सवाल

*⚡सिंधुदुर्गनगरी ता ०८-:* मंदिरांचे दरवाजे उघडले..जिल्हाधिकारी कार्यालयाचे कधी उघडणार..?असा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीच्या बंद दरवाज्यांवरून मनसेचे प्रसाद गावडे यांनी खोचक प्रश्न विचारला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र देखील तात्काळ सुरू करा..अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार वगळता बाकी इतर दरवाजे मागील अनेक महिन्यांपासून कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्याने सर्व सामान्य जनतेसोबत कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.विशेषतः पेन्शन सुविधेच्या कामासाठी येणारे माजी सैनिक व त्यांचे वृद्ध वारस लाभार्थी,वृद्ध शेतकरी,अशिक्षित कामगार वर्ग आदी कामांसाठी येणाऱ्या जनतेने नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.याशिवाय जिल्हा केंद्र स्थानी दाखले,शपथपत्र,हमीपत्र आदी विविध प्रशासकीय कामकाजासाठी येणाऱ्या जनतेची “सेतू सुविधा केंद्र” बंद असल्याने प्रचंड गैरसोय होत असून देखील जिल्हा प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे .हे दुर्दैवी आहे.आजमितीस राज्यातील मंदिरांची दारं उघडली त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीचे दरवाजे देखील सर्व सामान्यांसाठी खुले करावेत.जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन प्रशासकीय इमारतीचे अन्य दरवाजे सर्व सामान्यांसाठी खुले करावेत व सेतू सुविधा केंद्र चालू करावे अशी मनसेची आग्रही मागणी आहे. अन्यथा सर्वसमान्यसाठी आंदोलन करावे लागेल. असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page