चंदन वाहतूक प्रकरणी कारवाई

चंदन मिळाले पण संशयित पळाला आंबोली चेकपोस्ट येथे मध्यरात्री झाली कारवाई

*⚡आंबोली ता.०८-:* आंबोली चेकपोस्ट येथे चंदनाच्या झाडाच्या खोडाचे अंदाजे १५ ते २० किलो वजनाचे तुकडे वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले आहेत. परंतु, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत. सबंधित दुचाकी युवक पळून गेला आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा ०१:४५ वाजता करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री उशिरा १:४५ च्या सुमारास आंबोली चेकपोस्ट येथे चेकिंग दरम्याने पोलिस डी.जी.देसाई, पोलिस एस. कांबळे, पोलिस आर.डी.नाईक यांना तिकडून जाणाऱ्या एका मोटार सायकलचा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडील मोठ्या सॅक तपासली असता त्या मध्ये चंदनाच्या झाडाचे १५ ते २० किलो वजनाचे तुकडे आढळून आले. यावेळी त्या युवकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता. सबंधित युवक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जगलात पळून गेला. सबंधित आरोपीच्या ताब्यातील दुचाकी सह सापडलेला मुद्देमाल रिपोर्ट सह आंबोली वन विभागाकडे पुढील कार्यवाही साठी सुपूर्द करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page