स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
मालवण (प्रतिनिधी) मालवण बिळवस ते आंगणेवाडी हमरस्त्यावर रात्रीच्यावेळी विनापरवाना ठासणीची बंदुक घेऊन फिरणाऱ्या मसुरे भोगलेवाडी येथील हरी ऊर्फ रामचंद्र शशिकांत भोगले (वय २४) व गणेश अनिल भोगले (वय १८) या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. मसुरे भोगले वाडी येशील रामचंद्र भोगले आणि गणेश भोगले हे युवक रात्री १२ वाजण्याच्या सुमारास विनापरवाना ठासनीची बंदुक घेऊन बीळवस ते आंगणेवाडी जंगलमय परिसरात फिरत होते. याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी गस्त घालत असताना त्यांनी त्या युवकांचा पाठलाग केला. यावेळी युवकांनी आपल्याकडील ती बंदुक रस्त्यावरच टाकून पळ काढला. त्यातील एक युवक पोलिसांच्या ओळखीचा होता.आज सकाळी मसुरे भोगले वाडी येथे जाऊन पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री शेळके आणि त्यांचे पथक पोलीस उपनिरीक्षक भारत फारणे, विवेक फरांदे, प्रमोद नाईक यांनी केली.
