*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०७-:* जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मिळून एकूण 95.83 टक्के पाणीसाठ झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 436.6880 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.61 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 21.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.7070, अरुणा – 78.0938, कोर्ले- सातंडी – 25.0120. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.5767, ओटाव – 4.7134, देंदोनवाडी – 1.7043, तरंदळे – 4.5840, आडेली – 1.2540, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3130, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2680, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.269, ओझरम – 1.819, पोईप – 0.677, शिरगाव – 1.234, तिथवली – 1.7230, लोरे – 2.663 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण 95.83 टक्के पाणीसाठा
