लखीमपुर येथील शेतकरी नरसंहारच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारचा तालुका काँग्रेस कडून निषेध

*⚡सावंतवाडी ता.०७-:* उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचा जो नरसंहार करण्यात आला. व त्या दरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारचा सावंतवाडी तालुका कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यावेळी मोदी सरकार, योगी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, आनंद परूळेकर, विजय कदम, विल्यम सालढाणा, जास्मिन लक्ष्मेश्वर, बबलू डिसोझा, रूपेश आहीर, अलेक्स डिसोझा, लुईस डिसोझा, फ्रान्सिस साल्डणा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page