*⚡दोडामार्ग ता.०६ सुमित दळवी-:* श्री सातेरी जि.प. केंद्रशाळा साटेली भेडशी शाळेतील विद्यार्थी कु.दिग्गज दिग्विजय फडके याची सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड झाली आहे.चालू वर्षी 11 आगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परिक्षेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्हा भरातून मोठ्या संखेने विद्यार्थी सहभागी झाले होते देशभरातील नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशा साठी अखिल भारतीय स्थरावरील प्रवेश परिक्षा म्हणून नवोदयची प्रवेश परिक्षा ओळखली जाते ही परीक्षा इंग्रजी व हिंदी आणि प्रादेशिक भाषेमधे घेतली जाते. मनुष्यबळ विकास मंत्रालया मार्फत राबविल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांला बारावीपर्यंतचे शिक्षण मिळते. दिग्गजला केंद्रप्रमुख श्री सूर्यकांत नाईक, मुख्याध्यापिका श्रीम पूनम पालव, पदवीधर शिक्षक श्री दिपक दळवी, उपशिक्षिका श्रीम संपदा दळवी, श्रीम संजीवनी आवडण, श्री दिग्विजय फडके यांचे मार्गदर्शन लाभले. दिग्गज ने या अगोदर तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवर उज्जवल यश संपादन केले आहे.त्याच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री यशवंत धर्णे,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.छाया बाळेकुंद्रि , गटशिक्षण अधिकारी श्री.निसार नदाफ यानी अभिनंदन केले आहे.
दिग्गज दिग्विजय फडके याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड
