दाभोलीचे सुपुत्र व मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे निधन

*⚡वेंगुर्ले ता.०६-:* तालुक्यातील दाभोली गावचे रहिवासी आणि मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दाभोली वेंगुर्ले येथील मूळ गावी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. उपरकर यांनी मनसेकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्री दाभोलकर हे पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत कार्यरत होते त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विषेश भर दिला होता अनेक विषयावर त्याने प्रखरपणे आंदोलन उपोषणे केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page