जिल्ह्यात आणखी ७४ गावे ओडीएफ प्लस

*⚡ओरोस ता ५-:* 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व ‘स्वच्छ भारत दिवस’ याचे औचित्य साधुन जिल्ह्यातील 74 महसुल गावानी हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) दर्जा संपादन केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओडीएफ प्लस झालेल्या गावांची संख्या ११५ झाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.. याबाबत माहिती देण्यासाठी अध्यक्षा सावंत यांनी मंगळवारी दुपारी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रवीण काणकेकर आदी उपस्थित होते. २ ऑक्टोबर रोजी ओडीएफ प्लस झालेल्या गावांत कुडाळ तालुक्यातील 27, सावंतवाडी 15, देवगड 10, दोडामार्ग 4, वेगुर्ला 3, मालवण 5, कणकवली 8, वैभववाडी 2 अशा महसुल गावाचा समावेश आहे. यापुर्वी 15 ऑगस्ट रोजी २०२१ रोजी जिल्ह्यातील 41 महसुल गाव हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) जाहिर करण्यात आले आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यातील 741 महसुल गावापैकी 115 गावानी हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) दर्जा प्राप्त केला आहे, असे पुढे बोलताना अध्यक्षा सौ सावंत यांनी सांगितले. आपला जिल्हा हागणदारी मुक्त झालेनंतर जिल्ह्याची वाटचाल हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) कडे सुरु झाली होती. हागणदारी मुक्त गाव संकल्पनेत गावातील कुंटुबांकडे वैयक्तिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सर्व निकष पुर्ण असणे गरजेचे आहे. सदर निकष पुर्ण झालेवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन ग्रामसभा किंवा मासिक सभेचा ठराव घेऊन गाव हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ़ प्लस) जाहिर करण्यात येते. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत दिवस यांचे औचित्य साधुन देवगड तालुक्यातील- गवाणे, वाघिवरे, धोपटेवाडी, तळवडे, बापर्डे, जुवेश्वर, गिर्ये, वानिवडे, पाटगाव, हिंदळे. वैभववाडी तालुक्यातील- ऎनारी, कुंभवडे, कणकवली तालुक्यातील- पियाळी, तळेरे, शिवडाव, शिरवल, करंजे, नवी कुर्ली, लोरे नं.1, ओझरम, मालवण तालुक्यातील- असगणी, रामगड, गोठणे, बुधवळे, कुडोपी, कुडाळ तालुक्यातील- किनळोस, गवळगाव, घाडीगाव, सोनवडे, दुर्गनगर, नमसगाव, बेनगाव, गिरगाव, नमसपुर, आंबडगाव, गांधीग्राम, चेंदवण, कांडरगाव, साईगाव, कविलगाव, मिंटक्याचीवाडी, बेलनदी, रुमडगाव, कुसबे, मुळदे, वालावल, मुड्याचाकोंड, बांबुळी, वाडोस, मुणगी, खोचरेवाडी, टेंबेगाव वेंगुर्ले तालुक्यातील- कर्ली, गयाण, परुळेबाजार, दोडामार्ग तालुक्यातील- मोर्ले, पाट्ये पुर्नवसन सासोली खुर्द, आडाळी, कोलझर, सावंतवाडी तालुक्यातील- कोनाशी, गाळेल, डोंगरपाल, भालवल, डिंगणे, गेळे, पडवे माजगाव, पारपोली, रोणापाल, साटेली त सातार्डा, ताबोळी, कवठणी, किनळे, पाडलोस, वेत्ये आदी महसुल गाव हागणदारी मुक्त (ओडीएफ़ प्लस) जाहिर करण्यात आले आहेत. सध्यस्थित जिल्ह्यातीला 115 महसुल गावानी गाव हागणदारी मुक्त (ओडीएफ़ प्लस) दर्जा प्राप्त केला असुन कुडाळ 36, सावंतवाडी 18, देवगड 14, दोडामार्ग 9, वेंगुर्ला 4, मालवण 6, कणकवली 18, वैभववाडी 10 महसुल गावाचा समावेश आहे. फोटो ओळ:-सिंधुदुर्गनगरी:पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सभापती महेंद्र चव्हाण, अंकुश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर

आतापर्यंत ११५ गावे ओडीएफ प्लस;अध्यक्ष संजना सावंत, सीईओ प्रजित नायर यांची माहिती

You cannot copy content of this page