जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते वाटप

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-:* बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२९ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न झाली. सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात वाटप करण्यात आले. मार्च २०२१ अखेर बँकेस सर्व आवश्यक तरतूदी करून रू.१४ कोटी निव्वळ नफा झाला. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे बँकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी बँकेच्या नफ्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. गतवर्षी रिझर्व्ह बँकेने कोरोना साथीचा विचार करून संस्थांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होवू नये म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांनी लाभांश वाटप करू नये. त्याऐवजी लाभांश प्राप्त रक्कम भांडवलामध्ये गुंतवणूक करून बँकेची स्थिरता आणावी असे सुचविले होते. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती चांगली असूनही बँकेने लाभांश दिलेला नव्हता. जिल्हयातील सहकारी संस्था या जिल्हा बँकेच्या सभासद संस्था असून बँकेच्या भागभांडवलामध्ये त्यांचा प्रमुख वाटा असतो. या भागावर मिळाणारा लाभांश हा संस्थांसाठी महत्वाचा असून त्याच्या संस्था आपल्या सभासदांना लाभांश देत असते. सिंधुदुर्ग बँकेने गतवर्ष वगळता अन्य आर्थिक वर्षामध्ये मार्च २०१७ मध्ये ९.७५%, मार्च २०१९ मध्ये १०.५०%, मार्च २०१९ मध्ये १०.६०% असा चढत्या क्रमाने लाभांश दिला होता. बँकेच्या संचालक मंडळ सभेमध्ये यावर सविस्तर चर्चा होवून, बँकेने संस्थांना सरासरी दिला जाणारा लाभांश विचारात घेवून गतवर्षी राहिलेला लाभांश पुढील एक ते दोन वर्षात टप्या-टप्याने संस्थांना दयावा. चालू वर्षी नियमित लाभाश म्हणून १०% व मागील वर्षापोटी ५% मिळून एकूण १५% लाभांश देण्याची शिफारस वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२९ सप्टेंबर, २०२१ रोजी संपन्न झाली. सभेच्या मान्यतेने संस्थांना लाभांश आदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेकडून सभासद संस्थांना १५% लाभांश पत्रांची जिल्हा बँक अध्यश सतिश सावंत यांच्या हस्ते मंगळवारी बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात वाटप करण्यात आले

You cannot copy content of this page