वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे केले कौतुक
*⚡बांदा ता.०५-:* केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या योग्य अंमलबजावणी बद्दल केंद्र सरकारच्या पंचायत राज व ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने पाहणी करण्यासाठी आलेल्या नॅशनल लेव्हल मॉनिटर टीमने वाफोली ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या घरकुल, विहीर, शेती आदींसह अन्य कामांची पाहणीही पथकाने केली. गावातील संबंधित लाभार्थ्यासोबत संवाद साधला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या नीटनेटक्या कारभाराबाबत पथकाने कौतुक केले. यावेळी सरपंच अक्षता आरोंदेकर, उपसरपंच शुभदा आईर, विनेश गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, संस्थेचे प्रतिनिधी ज्ञानसुंदरवेल शिवनाथन, एस अबिद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सागर सावंत, डिस्ट्रिक्ट प्रसाद कांबळे, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, अधीक्षक जितेंद्र पाटील, सुनील खरवत, उद्देश सावंत, वाडीकर, नम्रता परब, संजीवनी चव्हाण आदी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का? संबंधित लाभार्थ्यां पर्यंत योजना पोहोचते का? याची चाचपणी करण्यात आली. ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल पथकाने समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी केले.
