मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडरेशनच्या वतीने पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वायरी तारकर्ली येथील हरिश्चंद्र उर्फ दादा तुकाराम वेंगुर्लेकर यांच्या दादा वेंगुर्लेकर बीच हाऊसला बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम अवार्ड हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी बीच हाऊस व्यवसायात पर्यटकांना चांगली सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार दादा वेंगुर्लेकर यांना देण्यात आला. कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दादा वेंगुर्लेकर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ प्रदान करून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर, चंद्रशेखर उपरकर आदी व इतर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल दादा वेंगुर्लेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दादा वेंगुर्लेकर यांच्या बीच हाऊसला बेस्ट सर्व्हिसेस टुरिझम अवॉर्ड पुरस्कार प्रदान
