बॅ. नाथ पै जन्मशताब्दी निमित्त महिलांसाठी ऑनलाईन खुल्या दशावतारी नाटक स्पर्धेचे आयोजन

मालवण : (प्रतिनिधी) बॅ. नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे फक्त महिलांसाठी ऑनलाईन खुली दशावतार नाट्य प्रवेश स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. १० वर्षांच्या मुलीपासून कोणत्याही वयोगटाच्या महिला या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. कोणताही पौराणिक अथवा काल्पनिक संवाद वेशभूषेसह व्हीडिओ स्वरुपात सादर करायचा आहे. वेळ ५ मिनिटे असून संगीतसाथ ऐच्छीक राहील. १७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ९ ते ५ या वेळेत ९४२०४२३७९० या क्रमांकावर व्हीडिओ पाठवावा. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रक तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्रक दिली जातील. स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page