स्वच्छतेत योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०३-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणा-या शहरातील नागरिकांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनंदिन कचरा संकलित करुन त्यापासून आपल्याच परिसरात खतनिर्मिती करणारे आनंदी आर्केड फेज-२, सुंदर भाटले आणि बायोगॅस निर्मिती करणारे रेडकर बंधू खानावळ, दैनंदिन ओला कचरा संकलित करुन आपल्याच परिसरात गांडुळ खत निर्मिती करणारे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, मांडवी खाडीतील कांदळवन स्वच्छता व संवर्धन मोहिमा करुन तो परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास हातभार लावणारा स्वामिनी महिला बचत गट, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन अंतर्गत पथनाट्य सादर करुन जनजागृती करणारा सखी महिला बचत गट व आपला कचरा नेहमी वर्गीकरण करुन देणारे रेश्मा वरसकर, राजश्री गायकवाड, कृपा बर्वे, अमित आरावंदेकर, सुप्रिया कोरगांवकर, विष्णू नाईक, गणपत परब या नागरिकांचा समावेश आहे. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे, वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी.एन.सावंत, नगरसेवक प्रशांत आपटे व शितल आंगचेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page