शहरातील जख्मी गाईच्या उपचारासाठी धावले तरुण…

गाईवर उपचार करून घडवले माणुसकी आणि भूतदयेचे दर्शन

सावंतवाडी-:शहरात बाजारपेठेत एक गाय जख्मी अवस्थेत फिरत असताना काल काही युवकांच्या निदर्शनास आली होती. त्या गाईच्या पाठीवर मोठी जखम झाल्याने ती गाय विव्हळत होती. हे त्या युवकांच्या लक्षात येताच त्या युवकांनी माणुसकी धर्म जप्त त्या गाईला दोरीने बांधून तिच्यावर उपचार केले आहेत. यासाठी आरिफ करोल या युवकाने पुढाकार घेऊन त्या गाईवर उपचार केले. या उपचारासाठी त्याला तोपिका शेख, आसिफ शेख, मोहसीन मुल्ला, मोहसीन करोल, वसीम करोल, जाफर खानापुरी, रॉक्सन डान्टस, राकेश चीतारी या युवकांनी त्याला सहकार्य केले. या सर्व युवकांनी आपल्या कार्यातून सर्वांना माणुसकी आणि भूतदयेचे दर्शन घडवले आहे. त्यानी केलेल्या कामामुळे सर्व स्तरातून त्या युवकांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page