खारेपाटण महाविद्यालयात गांधी जयंती साजरी
*⚡कणकवली ता.०२-:* मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘प्लस्टिक पिक अप डे’ चे औचित्य साधून पथनाटयाद्वारे स्वछता व प्लस्टिक मुक्तीचे धडे देऊन साजरी करण्यात आली. खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या हस्ते म.गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याना अभिवादन करण्यात आले.यावेळी खारेपाटण महाविदयालयाचे प्रा.वसीम सय्यद यांनी उपस्थित विदयार्थ्यांना अहिंसा व स्वछतेची शपथ दिली.या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण लरसर्क मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर,खारेपाटण ग्रा.प.सदस्या ऋतुजा कर्ले, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,संकेत शेट्ये, खारेपाटण महाविद्यालयाचे प्रा. सागर इंदप,श्रीम.रुची तेली,श्रीम.मंगल परब,नयन उगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खारेपाटण महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ते खारेपाटण बसस्थानका पर्यंतचा रस्ता स्वच्छ करत प्लास्टिक कचऱ्याचे एकत्रीकरण केले.तर खारेपाटण बस स्थानक येथे एन एस एस च्या विद्यर्थ्यांनी पथनाट्य सादर करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली.” आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याकरिता ‘प्लास्टिक मुक्त गाव” करणं हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन महाविदयालायचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कक्ष विदयार्थी प्रतिनिधी कु.अंकिता सुर्वे,सिद्धेश सावंत,कु.नीलम पांचाळ,कु.तन्वी शिंदे,कु.वैदिक घाणेकर,कु.सोनाली राऊत,कु.ऋतुजा जडयार,कु.प्राची मोरे,कु.माधुरी शेट्ये,कु.आदिती भालेकर,कु.साक्षी भालेकर,पुसपसेन निग्रे,यश राऊत,मनीष धुळप, सुजय पेडणेकर,विनय सावंत,विशाल शेलार,पथनाट्य प्रमुख कु.अंकिता सुर्वे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
