महात्मा गांधी जयंतीनिमित्त कणकवली नगरपंचायत उपक्रम
*💫कणकवली ता.०२-:* कणकवली नगरपंचायत परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृह येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव या सदराखाली सफाई मित्र, स्वयंसहायता महिला बचत गट यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात कणकवली शहरातील सर्व महिला बचत गट व नगरपंचयातीच्या आरोग्य विभाग , पाणी विभाग, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. मागील आठवडा भर कणकवली नगरपंचयातीने मुख्याधिकारी अवधूत तावडे व आरोग्य सभापती अभिजीत मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कचरा वर्गीकरण बाबतीत अपार्टमेंट मधील नागरिकांना मार्गदर्शन करणे,सफाई कर्मचाऱ्यांची कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
