*⚡सावंतवाडी ता.०२-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने आज २ ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष ला. अँड. परिमल नाईक, सचिव ला. अमेय पई, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, झेड. सी. ला. अशोक देसाई, ला गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर, ला. संतोष चोडणकर, ला. अरविंद पोकर, ला. बळवंत कुडतरकर, ला. रवी सावंत, ला. महेश पाटील, ला. अभिजित पणदूरकर आदी लायन सदस्य उपस्थित होते. तसेच गांधी जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी आणि नगरपरिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी शहरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. या मध्ये लायन अध्यक्ष अँड. परिमल नाईक, सर्व पदाधिकारी, लायन सदस्य, तसेच नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सभापती सुधीर अडिवरेकर, नगरसेवक, व पालिका कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
