राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त शहरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम…

नगरपालिका आणि आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आली मोहीम

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आज नगरपालिका आणि आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुना बाजार, माठेवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्वच्छतेचं महत्त्व विशद केले. सावंतवाडी नगरपरिषद, नरसोबा मित्रमंडळ जुनाबाजार, महिला बचतगट, कै. सुधाताई कामत विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक राजू बेग, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page