कणकवली शहरातील ढालकाठी येथील सुमती वाळके यांचे निधन

*⚡कणकवली ता.०१-:* कणकवली शहरातील ढालकाठी येथील रहिवासी श्रीमती सुमती सहदेव वाळके (91) यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महाराजा हॉटेलमध्ये त्या स्वतः विविध खाद्यपदार्थ तयार करीत असत. स्वादिष्ट वडापाव बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. हा वडापाव खाण्यासाठी हॉटेल महाराजामध्ये कणकवली वासिया सोबतच विद्यार्थी मित्रांची रीघ असे.गोड व मनमिळावू स्वभावाने त्या परिचत होत्या. महाराजा हॉटेलचे मालक बाळा वाळके,माजी नगरसेवक उमेश वाळके,उत्तम वाळके यांच्या त्या मातोश्री होत.कणकवलीतील स्माशनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page