रस्त्यावरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असताना ठेकेदारावर कारवाई का नाहीत

स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांचा सवाल

*⚡कणकवली ता.०१-:* रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे असून संबंधितांवर कठोर कारवाई का केली जात नाही ? ही कारवाई न झाल्याने या भ्रष्टाचाराला राजाश्रय आहे असे समजून तो अधिकच फोफावतो आहे , असे स्वतंत्र कोकण संघर्ष समितीचे संस्थापक प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हल्लाबोल केला. स्वतंत्र कोकणची सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी प्रा.महेंद्र नाटेकर बोलत होते.यावेळी श्री. वाय. जी. राणे , व्ही. के. जोशी , शरद पालव , महेश लाड , जे. जे. दळवी , सागर गावकर , गणेश सावंत , सुरेश खानोलकर इत्यादी उपस्थित होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर आंदोलने होत आहेत . काहीजण तर आंदोलनात व्यर्थ शक्ती खर्च करण्यापेक्षा स्वतःच ते बुजवितात व वाहतूक योग्य रस्ता करतात . परंतु ज्यांच्यामुळे हे खड्डे पडतात त्यांच्या विरुध्द कोणीच आंदोलने करत नाहीत . ‘ रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा ‘ एवढेच त्यांचे म्हणणे असते . रस्ते तयार करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना तेच हवे असते. कारण पुन्हा त्यांना त्याच कामाचा ठेका मिळतो आणि त्यांचा भ्रष्टाचारावर आधारीत उत्तम धंद चालतो . नियमानुसार रस्ते इत्यादी बांथकाम खात्याचा टेंडर्स काढून खर्च केला जातो . परंतु आमदार , खासदार व अन्य लोक प्रतिनिधी तो आपल्याच कार्यकर्त्याला कसा मिळेल हे पाहतात . तसेच काही लोकप्रतिनिधी कामात जर १५-२० % कमिशन देईल त्याला तो ठेका दिला जातो , असे बोलले जाते . दहा कोटीचे काम असेल तर पाच – सहा कोटींमध्येच ते पूर्ण केले जाते व मग चार – पाच कोटींचे संबंधित अधिकारी , ठेकेदार , लोक प्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्यामध्ये वाटप केले जाते आणि संपूर्ण गुप्तता ठेवली जाते . असे कुंपणच शेत खाते.मग कोण कोणाचे नाव सांगणार ? याची चौकशी होणे आवश्यक आहे . याला आळा घालण्यासाठी वरिष्ट अधिकाऱ्यांनी कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि ठेकेदार पदाचे लायसन रद्द करावे आणि नवीन रस्ते करताना रस्त्याचे नाव जाहीर करावे व रस्ते करताना त्याची लांबी , रुंदी , खोली , खडी , सिमेंट इत्यादी साहित्य किती लागणार ते त्या रस्त्यावर बोर्ड लावून जाहीर करावे . म्हणजे लोक ते पाहतील . रस्ता पुर्ण झाल्यावर त्याचे ५० % पैसे द्यावेत व उरलेले पैसे त्याला रस्ता टिकण्याच्या गॅरीटी नंतर द्यावेत . मधल्या काळात रस्ता खराब झाल्यास त्याने तो रस्ता स्वतः दुरुस्त करावा हाच त्याला मार्ग आहे . तरच रस्त्यावर खड्डे पडणारच नाहीत .

You cannot copy content of this page