एकता मित्रमंडळ व रोटरी क्लबचे आयोजन
मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठ येथील एकता मित्रमंडळ आणि रोटरी क्लब मालवण यांनी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त ओरोस ब्लड बँकेच्या मागणी नुसार आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रातदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा केला. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मालवण नगराध्यक्ष माहेश कंदळगावकर , नगरसेविका आकांशा शिरपुटे , माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर , माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर , रोटरी क्लब अध्यक्ष ऊमेश सांगोडकर , अमेय देसाई , रतन पांगे , गुरुनाथ नाईक , चाचा हडकर , राजेश कोवळे , सुहास ओरसकर , संजय गावडे, अभय कवटकर , मंदार ओरसकर , ऍड. ऋषिकेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि आरोग्य अधिकारी मालवण यांनी मनोगत व्यक्त केले. सध्या तापाच्या साथीचे रोग जास्त असल्याने आणि रक्ताची गरज प्लेटलेट्स वगरे कमी होण्यामुळे ब्लड बँक मध्ये रक्ताचा साठा कमी पडत आहे. या अशा परिस्थितीत आणि लसीकरण झाल्याने रक्तदाते मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे केलेले आयोजन कौतुकास्पद असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. सदर शिबिरास मालवण ग्रामीण रुग्णलायचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील तसेच मातृत्व आधार फाऊंडेशन चे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर आणि डॉ. साळवी यांनी भेट दिली. या शिबिरास ग्लोबल रक्तदाते मालवण समूह, धक्का मित्रमंडळाचे बाबू डायस , गौरेश कांबळी , भूषण पिसे यांच्यासह रक्त संकलन रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश गोडकर, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुनिल बागवे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किशोर नांदगावकर, चालक नितिन गांवकर, परिचर नंदकुमार आडकर, मदतनीस धाकु जाधव यांचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी विद्याधर मेस्त्री , हितेंद्र हिर्लोस्कर , ललित मेस्त्री , केदार देसाई , ऍड.रोहित गरगटे , तुषार मेस्त्री , मिलिंद कडू , वैभव मेस्त्री , संदीप पेडणेकर , विजय पांचाळ , राजा शंकरदास , अंकित कोवळे ,नभिराज वणकुद्रे , रोहित पाटकर, शैलेश मालांडकर , महेंद्र पारकर , ऊमेश हर्डीकर , दर्शन गावकर , आशा देसाई , रतन देसाई , अपूर्वा देसाई , किरण देसाई , यथार्थ कडू यांनी विशेष मेहनत घेतली.
