तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी फोडला नारळ
मालवण (प्रतिनिधी) आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग यांच्या सौजन्याने मालवण तालुक्यातील गोळवण आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन झाला. यावेळी या रुग्णवाहिकेचे पूजन उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळा महाभोज म्हणाले, गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचक्रोशीसाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या विषेश प्रयत्नातुन सदर रूग्णवाहिका उपलब्ध झाली आहे यांचा सर्व जनतेला आरोग्य उपचारासाठी चांगला उपयोग व्हावा अशी अपेक्षा महाभोज यांनी व्यक्त केली. तर हरी खोबरेकर म्हणाले, मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी या जिल्हयासाठी एकाचवेळी ३२ रुग्णवाहिका उपल्बध करून दिल्या आहेत यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिके अभावी होणारी गैरसोय दूर झाली आहे. मालवण तालुक्यातील हिवाळे आचरे पेंडुर मसुरे व आता गोळवण इत्यादी आरोग्य केंद्राना सुसज अशा रुग्णवाहिका उपल्बध झाल्या आहेत यामुळे उपचारासाठी इतर ठिकाणी जाणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळा महाभोज, विभागप्रमुख विजय पालव, पोईप विभाग समन्वयक श्रीकृष्ण पाटकर, उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण माजी सरपंच सौ प्रज्ञा चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. साळकर, डॉ. गोधडवाड, माजी उपसरपंच संजय पाताडे, एकनाथ चव्हाण, संदिप नाईक वायंगवडे सरपंच आनंद सावंत बाळकृष्ण खरात, आनंद चिरमुले, दिपक परब, दिगंबर सावंत, धनाजी चिरमुले जनार्दन गावडे, दिलीप हजनकर, संतोष माळकर महादेव पवार यशवंत चिरमुले व या आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी तसेच बहुसंख्य गोळवण शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
