ग्राम पंचायत स्तरावर सुरू आहेत विकास आराखडे

नोव्हेंबर महिन्यात तालुक्याचा एकत्रित आराखडा जिल्हा परिषदेला करणार सादर;बीडीओ जाधव यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी गावाचा विकास आराखडा तयार करून तो लवकरात पंचायत समिती प्रशासनाकडे दिल्यानंतर सर्व आराखडे एकत्रित करून नोव्हेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर पाठवण्यात येणार आहेत गावाचा विकास आराखडा बनविताना गावच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मालवणचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी येथे बोलताना केले गावांचा शाश्वत विकास’ दृष्टीने ग्रामविकास आराखडा २०२२-२३ तयार करणे बाबत मालवण पंचायत समिती येथे आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, विस्तार अधिकारी व इतर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी पंधरावा वित्त आयोग व अन्य योजनांच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून गावांचा शाश्वत विकास आराखडा तयार करणे. गाव विकास व मानवी निर्देशांक वाढ या बरोबर महिला बालविकास, शिक्षण- आरोग्य -उपजीविका, वंचित घटक विकास, स्वच्छता-पाणीपुरवठा, गावामध्ये नसलेल्या सुविधा देणे यांना विकास आराखड्यात प्राधान्य देत विकास आराखडा बनवणे. पंधरावा वित्त आयोग, उपलब्ध निधी व अन्य योजनांची जोड देऊन गावांचा विकास साधणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची कार्यशाळेस उपस्थिती होती. शेवटी सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी आभार मानले

You cannot copy content of this page