लवू तेरसे यांची मागणी
*⚡वेंगुर्ला ता.२८-:* वेंगुर्ला तालुक्यात विविध क्षेत्रात परंप्रातिय लोक काम करीत आहेत. ते अनधिकृतपणे रहात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतिय लोकांची नोंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्र सरकारने अनधिकृत राज्यातील अधिसूचनेद्वारे आंतरराज्य स्थलांतरीत कामगार अधिनियम १९७९ हा कायदाही लागू केला आहे. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी वेंगुर्ला तालुक्यात होताना दिसत नाही. परप्रांतियांकडून येणा-या काळात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडू नये यासाठी संबंधित प्रशासनाने योग्यवेळी त्यांना आवर घालावा अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते लवू तेरसे यांनी वेंगुर्ला तहसिलदार, वेंगुर्ला पोलिस स्टेशन व वेंगुर्ला मुख्याधिकारी यांना दिले आहे. वेंगुर्ला-कॅम्प भागामध्ये परप्रांतियांकडून विनयभंगाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहराची बदनामी झालेली आहे. गुन्हेगारी परप्रांतिय स्वतःच्या मूळ गावी मोठमोठे गुन्हे करुन ते लपविण्यासाठी सुरक्षित अशा वेंगुर्ला तालुक्याचा आश्रय घेत आहेत. अशांची माहिती घेऊन त्यांची संबंधित विभागाने नोंदणी ठेवावी असे श्री.तेरसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
