Headlines

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकर पूर्ण करून लोकार्पण करा

अन्यथा लोकशाही मार्गाने छेडणार; प्रविण गवस यांचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा

*दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक गावे अवलंबून आहेत.आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्रावर अतिदुर्गम गावातील लोक आरोग्य सुविधांचा लाभ घेतात, मात्र इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे आरोग्य सुविधावर मर्यादा येत आहेत, यासाठी आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून तिचे लोकार्पण करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रविण गवस यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्रावर रुग्णाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन संबंधित विभागाला योग्य त्या सुचना देऊन हे बांधकाम पूर्ण करून घ्यावे आणि रुग्णांची गैरसोय दूर करण्याची मागणी सरपंच सेवा संघ जिल्हा संघटक प्रविण गवस यांनी केली आहे.

You cannot copy content of this page