शेती नुकसान वाटपात शेतकऱ्यांची फसवणूक

ग्रामपंचायत कार्यालय समोर सर्व शेतकरी २ ऑक्टोंबरला बसणार उपोषणाला

*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे सतत दोन वर्ष पूर आणि त्यात आलेले तौक्ते वादळ आणि शासनाने केलेला अन्याय यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे.दोडामार्ग मधील शेतकऱ्यांना महिन्याभरापूर्वी नुकसानीबाबत निधीचे वाटप करण्यात आले होते मात्र ते पूर्णपणे चुकीचे व शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. नुकसानीच्या पंचनाम्या प्रमाणे वाटप करणे आवश्यक असून तसे न करता शासनाने आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे घोटगे येथील सर्व शेतकरी घोटगे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गांधी जयंती दिवशी म्हणजेच २ ऑक्टोंबर रोजी उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page