सातत्यपूर्ण अभ्यास केला स्पर्धा परिक्षांत यश

तहसीलदार अजय पाटणे

मालवण : सिंधुदुर्गातील मुले स्पर्धा परीक्षांमधून पुढे यायला हवीत. शासकीय नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हा महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित आहे. त्यासाठी चालू घडामोडींचे महत्व लक्षात घेऊन विविध वृत्तपत्रे वाचायला प्राधान्य द्यायला हवे. गणित, बुद्धिमत्ता या विषयांचा खंड न पाडता अभ्यास केला तर त्यातून मिळणाऱ्या नवनव्या क्लुप्त्या यशाचा राजमार्ग दाखवतील, असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले. मालवण येथील कन्याशाळा येथे अत्त दीप भव प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक सिद्धेश आचरेकर, स्वाती आचरेकर, प्राध्यापक नागेश कदम, विलास सरनाईक, हेमश्री चिटणीस, दिलीप देवगडकर आदी उपस्थित होते. पत्रकार संग्राम कासले यांनी विद्यार्थ्यांसाठी वही-पेनाची व्यवस्था केली. कार्यशाळेत मराठी विषयाबाबत प्राध्यापिका हेमश्री चिटणीस (सावंतवाडी), गणितसाठी पटाडे (कुडाळ), बुद्धिमत्तासाठी विलास सरनाईक, सामान्यज्ञानसाठी प्राध्यापक नागेश कदम गणित साठी के एस पटाडे कुडाळ तर मैदानी परीक्षा या विषयावर स्वप्नील वेंगुर्लेकर (गावराई) यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कदम तर आभार आचरेकर यांनी मानले. *तहसीलदार बनले शिक्षक !* कार्यशाळेच्या प्रारंभी तहसीलदार अजय पाटणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी थेट खडू हातात घेत फळ्यावर गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही क्लुप्त्या मांडल्या. विविध उदाहरणे देत त्यांनी तळमळीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने पेन देऊन सन्मान करण्यात आला. तहसीलदार पाटणे यांनी विद्यार्थ्यांना ‘ई पीक पाहणी’ अँपबाबत माहिती दिली.

You cannot copy content of this page