मालवण न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

*⚡मालवण ता.२३-:* मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दिवाणी न्यायालय मालवण येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील प्रलंबित तसेच वादपुर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. सदर लोकअदालती दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, मालवण यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

You cannot copy content of this page