एकात्मिक बालविकास कार्यालयाचा उपक्रम
*दोडामार्ग / सुमित दळवी* एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मेढे व सोनावल अंगणवाडी मार्फत आज ग्रुप ग्रामपंचायत तेरवण मेढे याठिकाणी रान भाज्या प्रदर्शन व परसबाग विषयी माहिती हा उपक्रम राबविण्यात आला. प्रदर्शनात वेगवेगळ्या रानभाज्या तसेच परसबागेत तयार होणाऱ्या भाज्या त्याठिकाणी मांडण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास सरपंच सौ सोनाली सुनिल गवस अंगणवाडी पर्यवेक्षीका ममता गवस सरपंच माजी सरपंच प्रविण गवस ग्रामपंचायत सदस्य नमीता गवस माजी सरपंच मनीषा गवस अंगणवाडी सेविका प्रेरणा गवस ,रोशन गवस मदतनीस प्रतीक्षा धरणे ,मनशान्न्ति गवस,महिला किशोरवयीन मुली आदि मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ देसाई यांनी सर्व रानभाज्या विषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तर अंगणवाडी सेविका प्रेरणा गवस यांनी आभार मानले.
