दिड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

*⚡बांदा ता.११-:* वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना आज शनिवारी दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ या गजरामध्ये बांदा दशक्रोशील दीड दिवसाच्या बाप्पांचे आज विसर्जन करण्यात आले. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावांत तलावाची सफाई केलेले पहावयास मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’…’एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’, या जयघोषांसह बांदा दशक्रोशीतील दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा आज पार पडला. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नियम पाळत शुक्रवारी गणरायाचे मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले होते. आज दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारनंतर दीड दिवस पूर्ण होताच कोरोना नियमांचे पालन करत गणपती मूर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

You cannot copy content of this page