*⚡सावंतवाडी ता.०९-:* आगामी काळात जिल्हा बँकेची निवडणूक होणार असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी लागली तरीही आपण ती निवडणूक लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक भाजपच्या हातात जाऊ देणार नाही असे स्पष्ट मत सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिरोडा उपसरपंच सिद्धेश परब, अन्वर शेख, ज्यास्मिन लक्षमेश्र्वर आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक भाजपच्या हातात जाऊ देणार नाही – राजन भोसले
