प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केला विश्वास
*⚡सावंतवाडी ता.०८-:* काँग्रेस पक्षाच्या वाईट काळात जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात गेले. या काळात काँग्रेस पक्ष जिल्ह्यात संपूर्ण ढासळला होता. परंतु, काँग्रेस पक्ष आता नव्याने उभारी घेत असून, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे पक्षाचा झेंडा सर्वत्र फडकवतील असा विश्वास प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिरोडा उपसरपंच सिद्धेश परब, अन्वर शेख, ज्यास्मिन लक्षमेश्र्वर आदी उपस्थित होते.
