कास – कोल्हेभाट येथील युवकांचा पाण्यात पडून मृत्यु

बांदा : प्रतिनिधी कास-कोल्हेभाट येथील तुषार बबन सातार्डेकर (वय ३५) याचा पाण्यात पडुन मृत्यु झाला. तुषारचे गेले काही दिवस मानसिक संतुलन बिघडले होते. बुधवारी सकाळी घरात कोणालाही न सांगाता तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्यांची आईने सर्वत्र शोधाशोध केली. त्यांनतर तिने वाडीतील ग्रामस्थाना तो सापडत नसल्याचे सांगतले. ग्र‍ामस्थ‍ानी शोधा शोध केले असता कुसवाळ ओहळात मृतदेह दिसून आला. त्यांतर बांदा पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिस घटनास्थळी दाखल होत त्य‍ाचा मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात आणून डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन केले. युवकाचा पाण्य‍ात बुडून मृत्यू झाल्य‍ाचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. बांदा पोलिस स्थानक‍ात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तुषारच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, काका काकी भाऊ असा मोठा परिवार आहे, तुषारच्या आकस्मित निधमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page