मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन
*⚡वैभववाडी ता.०२-:* वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेने गणेशोत्सव निमित्त गावा-गावात आरती संग्रह वाटपाचे आयोजन केले आहे. या आरती संग्रहाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयात मनसे नेते श्री.अमितसाहेब राजसाहेब ठाकरे, नेते श्री.शिरीष सावंत साहेब, सरचिटणीस श्री.परशुराम(जीजी) उपरकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री.चंद्रशेखर सावंत, संस्थेचे सचिव आणि मनसे वर्सोवा उपविभाग अध्यक्ष श्री.विशाल हरयाण, मनसे सहसंपर्क अध्यक्ष श्री.विवेक कुडतरकर, मनविसे संपर्क सचिव श्री.ज्ञानेश्वर मोरे, संस्थेचे खजिनदार श्री.महेश रावराणे, संस्थेचे संपर्क अध्यक्ष श्री.दिनेश चाळके, सल्लागार श्री.दिलीप सावंत, संतोष सावंत, सदस्य श्री.दत्ताराम सोनार उपस्थित होते.
