रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

सुभद्राबाई शिक्षण निधी संस्थेचा उपक्रम;सरकारमान्य अभ्यासक्रमासाठी मिळणार मदत

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेतर्फे रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी उत्तीर्ण होऊन कोणत्याही सरकारमान्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असल्याची माहिती बापू गिरप (मुंबई) यांनी दिली आहे. यासाठी गुणांची अट नाही. इच्छुक विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवावेत,असे आवाहन संस्थेचे चिटणीस सुभाष कुळकर्णी यांनी केले आहे. याबाबतची अधिक माहिती संस्थेच्या www.subhadrabaishikshannidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

You cannot copy content of this page