*⚡मालवण ता.३१-:* रोटरी क्लब मालवणच्या वतीने दि. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पोषण सेमिनार, पाककृती स्पर्धा, हिमोग्लोबिन व बोन डेन्सीटी कॅम्प, कुपोषित मुलांना पौष्टिक आहार वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता झूम ऍपद्वारे पोषण सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. हरीश परुळेकर , डाॅ. अमोल झांटये, डॉ. शर्मिला कुलकर्णी व आहारतज्ज्ञ विनया बाड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २ सप्टेंबर रोजी पौष्टिक नाश्ता बनविण्याची पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा हॉटेल जानकी कुंभारमाठ येथे घेण्यात येणार आहे. विजेत्याला रोख रक्कम व चषक तसेच द्वितीय व तृतीय क्रमांकाला रोख रक्कम व पारितोषिक देण्यात येणार आहे. तर ३ सप्टेंबर रोजी हिमोग्लोबिन व बोन डेन्सीटी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ही तपासणी मोफत असून सकाळी दहा वाजल्यापासून लिमये हॉस्पिटल येथे ही तपासणी करण्यात येईल. ३ सप्टेंबर राेजी दुपारी मालवण पंचक्रोशीतील कुपोषित मुलांना पौष्टिक आहारचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब मालवणच्या माता व बालसंगोपन चेअरमन रोटेरियन डॉ. लीना लिमये यांनी दिली आहे. पोषण सेमिनारचे तसेच हिमोग्लोबीन व बोन डेन्सीटी कॅम्पचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांनी केले आहे.
पोषण सप्ताहानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
