हरी खोबरेकर यांनी टीका करताना अभ्यास करावा

भाजपा तालुकाध्यक्ष चिंदरकर यांचा सल्ला

*⚡मालवण ता.३१-:* बंधाऱ्यासाठी क्रोसेक्शन सर्वेचे १२ लाख रुपये राज्य सरकार उपलब्ध न करू शकल्याने तळाशील आणि देवबाग वासियांना सागरी अतिक्रमाणाला तोंड द्यावे लागत आहे. आम. वैभव नाईक एवढे पैसे उभारू शकत नाही किंबहुना त्यांची व सरकारची मानसिकताही नसल्याने ते १२ लाख रुपये भरण्याची टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तळाशील बंधाऱ्यांसाठी माजी खासदार निलेश राणे यांचे १० कोटीचे आश्वासन हवेत विरल्याची टीका करणारे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे या गोष्टींचा अभ्यास करून बोलले असते तर तोंडावर पडण्याची वेळ आली नसती, अशी टीका भाजपचे तालुकाप्रमुख धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. बंधारा होण्यासाठी कुठल्या प्रकारचे साहित्य आणि नेमके काय केल्याने अतिक्रण थांबेल याचा सर्वे म्हणजेच क्रोसेक्शन सर्वे होणे गरजेचे आहे आणि तो सर्वे करण्यासाठी १२ लाख रुपये भरणे अपेक्षित आहे. ते १२ लाख रुपये का भरले जात नाही त्याचे उत्तर दिले तर लोकांनाही कळेल कि या कामात कोण खोड घालत आहे. आमदार वैभव नाईक यांना कल्पना आहे कि त्या कामासाठी लाख सोडा काही कोटी रुपये लागणार आहेत. पण तेवढा पैसा आमदार व राज्यसरकार तळाशील वासियांसाठी उपलब्ध करू शकत नाही. किंबहुना एवढे पैसे देण्याची त्यांची मानसिकता नाही. म्हणूनच हे १२ लाख रुपये भरायला टाळाटाळ करत आहेत. जो पर्यंत क्रोसेक्शन सर्वे होत नाही तो पर्यंत मोठ्या प्रमाणात निधी मिळणार नाही, हे आमदारांना माहीत आहे. तात्पुरत्ता पर्याय काढून आणि २५/ ३० लाख देऊन काहीही होणार नाही, अशी टीका धोंडू चिंदरकर यांनी केली आहे. तळाशील, देवबाग, तारकर्ली बंधाऱ्यासाठी ठोस कामाची कृती केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नेहमी किनारपट्टीच्या लोकांच्या संरक्षणासाठी धावून आलेले आहेत. याची जाण लोकांना आहे. तेव्हा शिवसेनेने त्याची काळजी आपल्याला आहे असे भासवू नये. निलेश राणे हे पूर्ण मालवण किनारपट्टी सुरक्षित राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत, लवकरच त्याची कृती दिसेल, असे धोंडू चिंदरकर यांनी सांगत आमदार वैभव नाईक यांनी तळाशील स्म्शान भूमी रस्त्यासाठी निधी देण्याचे आश्वासन देऊन बरीच वर्षे झालीत त्याच काय झालं ते हरी खोबरेकर यांनी विचारून घ्यावे आणि तळाशील वासियांना पण सांगावे, असेही धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page