सैनिक फंडात कोट्यवधी रुपये पडून मात्र सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी खर्च करत नाही

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आरोप;१६ डिसेंबरला सैनिक आझाद मैदानावर उतरतील

*⚡सावंतवाडी ता.३१-:* सैनिक फंडात कोट्यवधी रुपये पडून असूनही, राज्य सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी होत असलेल्या मागण्यांवर जाणीवपूर्वक खर्च करत नसल्याचा आरोप माजी खासदार तथा महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवेळी सैनिकांवर अन्याय केला गेला आहे. सैनिकांच्या अनेक मागण्या अजूनही सरकारकडे प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण न झाल्यास १६ डिसेंबर रोजी ५० हजारहून जास्त सैनिक आझाद मैदानावर उतरतील असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page