मत्स्य विक्रेत्या महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवावी

महिला मच्छिमार कृती समितीचे नगराध्यक्ष कांदळगांवकर यांच्याकडे मागणी

*⚡मालवण ता.३१-:* मालवण येथील मच्छीमार्केटमध्ये मासे विक्रीला येणाऱ्या महिलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र महिला मच्छीमार कृती समितीच्या जिल्हाध्यक्षा स्वप्नाली तारी यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे केली आहे. महिला मच्छीमार कृती समितीतर्फे लसीकरणाबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा आरती खडपकर, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, उपाध्यक्ष भाऊ मोरजे आदी उपस्थित होते. मालवण मासळी मार्केट येथे शहर व आजूबाजूच्या गावातील महिला मोठ्या संख्येने येतात. मासे विक्री व्यवसाय करताना महिलांचा अनेक व्यक्तींशी संपर्क येत असतो. त्यामुळे मासे विक्रेत्या महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

You cannot copy content of this page