मेजर ध्यानचंद यांचे व्यक्तिमत्त्व खेळाडूंना प्रेरणादायी:डॉ.अनिल फराकटे

क्रीडा स्पर्धेतील गुणवंतांचा सत्कार

*⚡कणकवली ता.३०-:* मेजर ध्यानचंद यांच्या उज्ज्वल कारकिर्दीत ‘भारतीय हाॅकी’ अशी ओळख भारताला मिळाली.केवळ आॅलिम्पिक मध्ये ३७ गोल करणारे अद्वितीय खेळाडू म्हणून ते अजरामर आहेत.’ गोल’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र आजच्या पिढीने जरुर वाचले पाहिजे.’हाॅकीचे जादुगार’ म्हणून संबोधले जाणारे मेजर ध्यानचंद हे आजच्या सर्व विद्यार्थी व तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे’असे प्रतिपादन कणकवली काॅलेज, कणकवली येथील प्र.प्राचार्य डॉ.अनिल फराकटे यांनी केले. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन जिमखाना विभागाच्या वतीने कणकवली काॅलेज, कणकवली येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला त्यावेळी डॉ.फराकटे बोलत होते. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले तसेच कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा मार्गदर्शक शिक्षिका जयश्री कु.कसालकर यांचा सन्मान करण्यात आला. ज्युडो या क्रीडा प्रकारात राज्य स्तरीय पातळीवर रौप्य पदक आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात कोकण विभागीय पातळीवर कांस्य पदक मिळवलेली विद्यार्थीनी कु.महेक रिझवान शेख हिचा तसेच जिल्हातील फुटबॉल स्पर्धेत सर्वद्वितीय ठरलेल्या संघातील खेळाडू दिशांत राजेंद्र कांबळे,कुणाल महेंद्र कदम यांचाही प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हरीभाऊ भिसे,प्रा.मनोज कांबळे उपस्थित होते.सुत्रसंचालन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.सत्यवान राणे यांनी केले.प्रस्ताविक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले व शेवटी आभारी प्रदर्शन एनसीसी विभाग प्रमुख कॅ. डॉ. बी.एल.राठोड यांनी केले.

You cannot copy content of this page