महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना धर्मादाय आयुक्तांकडून १ कोटी पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

मालवण दि प्रतिनिधी गेल्या महिन्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुराने तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत होऊन जीवित आणि आर्थिक हानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे धर्मदाय आयुक्तांनी राज्यातील विविध धर्मदाय संस्थांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत विविध धर्मादाय संस्थांनी आतापर्यंत १ कोटी १ लाख ५९ हजाराचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे. हा निधी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रदान सचिव विकास खरगे यांच्याकडे सुपूर्द केला. सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्व म्हणून राज्यातील विविध धर्मादाय संस्थांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना शक्यती मदत करावी असे आवाहन धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी केले होते. त्यानंतर राज्यातील विविध संस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ५६ लाख ९३ हजार रुपयाचा पहिल्या टप्प्यातील धनादेश सुपूर्द केला होता. तर दुसऱ्या टप्प्यात ११ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आले होते. तर तिसऱ्या टप्प्यात ३३ लाख ५६ हजार रुपयांचा तिसरा धनादेश अलीकडेच जमा करण्यात आला. धर्मदाय आयुक्तांच्या आवाहनाला अनेक संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली

You cannot copy content of this page