*⚡मालवण ता.२९-:* चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले. मात्र शासनाने अर्धवट पंचनामे केले. त्यात ज्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या नेत्यांनी लक्ष घालावे अशी मागणी रेवंडी येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सच्छिदानंद कांबळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. वादळात आपल्या घराचे नुकसान होऊन मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करूनही अद्याप कोणतीही मदत आपल्याला मिळालेली नाही असेही सच्चिदानंद कांबळी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान किसान योजना ग्रामीण भागात शासनाने राबवली. परंतु ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. याची चौकशी करण्यात यावी. याबाबत भाजपचे वरिष्ठ तसेच मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेते लक्ष घालतील अशी अपेक्षाही सच्चिदानंद कांबळी यांनी व्यक्त केली आहे
वादळग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळल्याबाबत भाजप नेत्यांनी लक्ष घालावे
