राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची मागणी
*⚡देवगड ता.२७-:* देवगड तालुक्याचा बहुतांशी कातळ भाग असल्याने चार दिवस पाऊस न झाल्यास शेती सुकून पिवळी पडते. तालुक्यात पावसामुळे सध्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे. कडक ऊन असल्याने करपा रोगामुळे उत्पादन मिळणारे भातपीक वाया जाण्याची स्थिती असल्याने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली निवेदनात म्हटले आहे की यंदाच्या हंगामात सुरूवातीपासून समाधानकारक पाऊस झाला. देवगड तालुक्याचा बहुतांशी कातळ भाग असल्याने चार दिवस पाऊस न झाल्यास शेती सुकून पिवळी पडते. तालुक्यात पावसामुळे सध्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे. कडक ऊन असल्याने करपा रोगामुळे उत्पादन मिळणारे भातपीक वाया जाण्याची स्थिती आहेत्यामुळे चांगले भातपीक येण्याच्या आशेवर शेतकरी होते. त्यासाठी शेतकर्यांनी बियाणे, खत, मशागती आदीवर बराच खर्च केला. मात्र चालू महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भातपीक सुकू लागले आहे. देवगड तालुक्याचा बहुतांशी कातळ भाग असल्याने चार दिवस पाऊस न झाल्यास शेती सुकून पिवळी पडते. तालुक्यात पावसामुळे सध्या अशीच अवस्था निर्माण झाली आहे. कडक ऊन असल्याने करपा रोगामुळे उत्पादन मिळणारे भातपीक वाया जाण्याची स्थिती आहे. पावसाअभावी शेतीसह भाजीपाला उत्पादनाचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे शेतीसाठी झालेला बीयाणे, खते तसेच व्यवस्थापनावरील खर्च वाया जावून शेतकरी अडचणीत सापडणार आहेत. आधीच कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यातच आता हवामान बदलामुळे शेतीवरील रोगामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीत जाण्याची शक्यता आहे. तसेच देवगड तालुक्यातील प्रसिध्द हापूस आंबा पीकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा कलमे अकाली मोहोरून यंदाच्या आंबा हंगामवरही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी कृषि विभागाने तातडीने तालुक्यातील सर्वच भागातील पावसाअभावी अडचणीत आलेल्या भातपिकाचे सर्वेक्षण करावे अशी देवगड राष्ट्रवादीची मागणी आहे. तसेच रोजच्या हवामान बदलामुळे मासळी मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मासेमारीवर होणारा डिझेल खर्च आणि त्यामानाने मिळणारी मासळी याचा विचार करता मच्छीमारही आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर कृषि विभागाला तालुक्यातील भात पिकाचे तातडीने सर्वेक्षण करण्याची सुचना करावी अशी आमची मागणी आहे. तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर, सरचिटणीस शरद शिंदे,दशरथ लोके, विलास कामतेकर,तात्या वाळके,सुमंत वाडेकर,अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
