गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तातडीने डागडुजी करून वीज पुरवठा सुरळीत करा

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी वीज वितरणचे वेधले लक्ष

देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील नागरिकांना विजेची मोठी समस्या जाणवत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही भागातील वीज वारंवार जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोकणच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गणेशोत्सव सण आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशावेळी सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत राहिल्यास गणेश भक्तांमधील नाराजी वाढू शकते. कोरोनामुळे गेले अनेक महिने व्यापार, उद्योग बंद स्थितीत होता. आता गणेशोत्सव काळात व्यवसाय होण्याची व्यापार्‍यांना आशा आहे. अशावेळी सतत वीज जात राहिल्यास व्यापार्‍यांनाही मोठी अडचण भासू शकते. यासाठी गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी व खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी उपविभागीय अधिकारी म रा. रा वि वितरण कंपनी देवगडचे उपअभियंता एन एन शेख यांचेकडे लेखी निवेदन द्वारे केली आहे. या वेळी शाखा अभियंता गणेश कानडे उपस्थित होते.या बरोबरच वीज वाहिन्यांना स्पर्श करणारी रस्त्यालगतची झाडी तोडून घेण्यात यावी. नादुरूस्त विद्युत उपकरणे तातडीने बदलण्यात यावीत. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून नवीन विद्युत साहित्य वेळीच उपलब्ध करून घेण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून वेगाने दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा सुरळित रहावा अशी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्यामुळे या मागणीकडे आपण जातीने लक्ष देऊन गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी काळजी घेण्याची तसेच त्यादृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणीही राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर, सरचिटणीस शरद शिंदे,दशरथ लोके, विलास कामतेकर,तात्या वाळके,सुमंत वाडेकर,अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page