विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठीच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

राजन साळवी,वैभव नाईक यांनी गुन्हा संजय राऊतावर नोंदवावा:प्रमोद जठार

*⚡कणकवली ता.२६-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सकल्पेनेतून देशभर जन आशीर्वाद यात्रा काढण्याची निर्णय घेतला.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ७ वर्षात घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे,राममंदीर, जनधन योजना व अन्य कामे लोकांपर्यंत जाऊन सांगा, राहिलेल्या कामांबाबत आश्वाशीत करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.मुबंईपासून ही यात्रा कोकणात निघाली.आता ही यात्रा शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रत्नागिरी शहर येथून निघेल,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस जन आशीर्वाद यात्रा होईल,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.त्यामुळे आम.राजन साळवी,आम.वैभव नाईक यांनी गुन्हा नोंदवायचा असेल तर खास.संजय राऊतावर नोंदवावा,असा सल्ला भाजपा माजी आमदार प्रमोद जठार दिला आहे. कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक माजी आम.प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे,सभापती मनोज रावराणे, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,सुशिल सावंत,प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले,केंद्रीय मंत्री नारायण राणे काय चुकीचे बोलले,राणे ३९ वर्षे शिवसेनेत होते, त्यामुळे ठाकरी भाषेत बोलले, कारण उद्धव ठाकरेंना ठाकरी भाषा पेलवत नाही.दसरा मेळाव्याची भाषण काढली तर १०० केसेस होतील.ठाकरी भाषेचा उगम तुमच्याकडून आहे.विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी हा दौरा आहे.दोन वर्षात न्याय कोकणला दिल्याशिवाय राहणार नाही.छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.त्यामुळे राजन साळवी,वैभव नाईक यांनी गुन्हा नोंदवायचा असेल तर संजय राऊतावर नोंदवावा,असा सल्ला भाजपा माजी आमदार प्रमोद जठार दिला आहे. या 19 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रायात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे अनेक समस्या जनतेने मांडल्या आहेत.महाड पूर रेल्वे ब्रिज पूर्ण झाला तर पूर स्थिती निर्माण होणार नाही.चिपळूणमध्ये पूरग्रस्तांना भेटून पुढे निघाले केंद्रीय मंत्री होते.हिंदू धर्म रक्षक संभाजी महाराज कसब्याकडे निघाले असता दगा फटका दिला.पोलिसांना मी सांगत होतो, नोटीस द्या,अटकेला आम्ही विरोध करत नाही.स्थानिक एसीपी निर्दयीपणे वागत होते.मोगलाईने वागत होते, दरवाजा तोडण्याचे एसीपीने सांगितले. नोटीस द्या,हे ऐकलं नाही.जनतेला कळलं पाहिजे, मोगलाई पध्दतीने अटक राणेंना केली असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला. मराठा समाज पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना कुणाचीच होऊ शकत नाही .त्यामुळे आम.राजन साळवी व आम.वैभव नाईक यांनी विपर्यास करून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये असे प्रमोद म्हणाले. यावेळी मराठा समाजाच्यावतीने बोलताना सुशील सावंत म्हणाले ,माजी आम.प्रमोद जठार यांनी इतिहासाचा दाखला देत संभाजीराजे यांचे उदाहरण दिले आहे .त्यांनी कुणाची कुणाशी तुलना केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न होत नसल्याची त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page