*⚡कणकवली ता.२६-:* जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी कणकवली पोलिसांच्या पथकाने भाजप कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत . जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यात 7 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी 149 ची नोटीस भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बजावण्यास सुरुवात केली असल्याने पोलिसांनी भाजप कार्यालयात दाखल होत कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. या नोटीसमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांकडून तसेच त्यांच्या सहकाऱ्यांकडून कोणताही प्रकारचे गैरकृत्य झाल्यास सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून कणकवली पोलिसांनी बजावल्या नोटीसा
