प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीने साजरे केले अनोखे रक्षाबंधन

मालवण येथील आपत्ती निवारण टीमला रक्षाबंधन करून जोपासली सामाजिक बांधिलकी

*⚡ओरोस ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही दुर्घटना असो, पूर असो वा चक्री वादळ असो. तसेच २०१९ मधील सांगलीचा महापूर असो वा २०२१ चिपळूणचा महापूर असो;अशा प्रत्येक आपत्तीच्या वेळी शासन मदतीची अपेक्षा न करता स्वयंस्फुर्तीने व स्वखर्चाने मालवणमधील रेस्क्यु टीम श्री. दामोदर तोडणकर यांच्या नेतृवाखाली आपला जीव धोक्यात घालून अपुऱ्या साधनसामुग्रीसहित निस्वार्थपणे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहे. ही सेवा बजावत असताना शासन तसेच समाजातून हे योद्धे दुर्लक्षित राहत आहेत.याची जाणीव ठेवून या योध्याना त्यांच्या साहित्यासाठी मदत तसेच त्यांच्या हातात आशीर्वाद रूपी मायेचा धागा बांधण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती महिला आघाडी शाखा मालवण यांच्यावतीने आज संपन्न झाला रेस्कू टीमला मालवण जेटी येथे रक्षाबंधनचा अनोखा कार्यक्रमाच्या वेळी रेस्क्यु टीमने आपले थरारक अनुभव उपस्थित सर्वांना सांगितले. नंतर संघटनेच्यावतीने सर्व सदस्याचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. आपत्ती निवारण मोहिमेच्या वेळी लागणाऱ्या साहित्यासाठी शिक्षक भारती महिला आघाडीच्या वतीने ₹ ५०००/- ची देणगी सदर टीम कडे सुपूर्द करण्यात आली. नंतर रक्षाबंधन होवून कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी शिक्षक भारती च्या वतीने सेजल परब, आशा गिरी, शितल परुळेकर, वैशाली मिसाळ,कल्पना भरसट,स्वरा शिंदे, ममता कुबल, लीना भंडलकर,शुभांगी तायडे,रिया झोरे, सरिता नाईक, विद्या कावटवार, रंजना नातेवाड, शिल्पा लवटे, कृष्णा कालकुंद्रीकर,तुकाराम खिल्लारे,बंडू राठोड ,भागवत अवचार ,लक्ष्मण आकेरकर,महादेव घोडके,संजय जाधव ,लहू पाटील, दिनकर शिरवलकर,महेश कदम विनेश जाधव, तालुका सरचिटणीस संतोष परब व जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page